१९ चा दशक एकक दशक अधिक
पाढा एककाची दुप्पट
१९ १ ९ १+९*२ = १९
३८ ३ ८ ३+८*२ = १९
५७ ५ ७ ५+७*२ = १९
७६ ७ ६ ७+६*२ = १९
९५ ९ ५ ९+५*२ = १९
११४ ११ ४ ११+४*२ = १९
१३३ १३ ३ १३+३*२ = १९
१५२ १५ २ १५+२*२ = १९
१७१ १७ १ १७+१*२ = १९
१९० १९ ० १९+०*२ = १९
वरील सारणीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की (१) दशकांच्या संख्या दोन ने वाढत गेली आहे.[१,३,५,……१९](२)एककांची संख्या एक ने कमी होत गेली आहे. [९, ८, ७, ६, … ०] (३) या पाढयातील कोणत्याही संख्येमधील दशकांमध्ये एककांची दुप्पट मिळविल्या एकोणिस ही संख्या मिळते.
या माहितीवरून १९ च्या विभाज्यतेची कसोटी मिळते.
दिलेल्या संख्येतील एककांची दुप्पट त्याच संख्येतील दशकांच्या संख्येत मिळावा. (ही बेरीज १९ पेक्षा मोठी असेल तर पुन्हा एककांची दुप्पट दशकांच्या संख्येत मिळावा) जर अंतीम उत्तर १९ असेल तर दिलेल्या संख्येला १९ ने नि:शेष भाग जातो.
१३४७२९ या संख्येला १९ ने भाग जातो किंवा नाही ते पुढील अकडेमोडीने पाहू.
१३४७२९…..… १३४७२+(९×२) = १३४९०
१३४९०………. १३४९ +(०×२) = १३४९
१३४९………… १३४ +(९×२) = १५२
१५२………….. १५ +(२×२) = १९
म्हणजे १३४७२९, १३४९०, १३४९ आणि १५२ या सर्व संख्या १९ ने विभाज्य आहेत.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची