कोडे क्रमांक ५
एक चौरसाचे आणि एका आयताचे क्षेत्रफळ समान आहे. चौरसाची बाजू आयताच्या रुंदीच्या दीडपट असून आयताची लांबी चौरसाच्या बाजूपेक्षा ६ सेमी ने जास्त आहे. तर त्या आयताची परिमिती किती ?
—
कोडे क्रमांक तीन चे उत्तर
* संख्येतील डावीकडेचे तेरा अंक समान
* संख्येतील उजवीकडेचे तेरा अंक समान
* संख्येतील १४ वा अंक तीन आहे
* ७३७ ला ११ ने भाग जातो (६७×११=७३७)
* म्हणून संख्येतील सर्व अंकांची बेरीज बरोबर
(१३ × ७) + (३) + (१३ × ७) = १८५.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर