दशमान पद्धती
सामान्यपणे मोजमापन व्यक्त करण्यासाठी संख्यांचा उपयोग करतात. दशमान पद्धतीने संख्या लेखन करणे ही भारताने जगाला दिलेली बहुमूल्य देणगी आहे. संख्या लेखन हे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दशमान पद्धतीनेच केले जाते. दशमान पद्धतीने केलेले संख्या लेखन म्हणजे शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, आणि नऊ या दहा अंकचिन्हांचा उपयोग करून लिहिलेली ही संख्या होय.
दशचिन्ह पद्धती
( देवनागरी अंकचिन्हे ०, १, २ ,३ ,४ ,५ ,६ ,७ ,८ आणि ९ आहेेेत.)
(रोमन पध्दतीमध्ये I, II, III, IV, V, VI, VII, VIII, IX, X,…., ही दहा अंकचिन्हे आहेत. याशिवाय L, C, D व L ही संख्याचिन्हे आहेत. ही रोमन संख्यायालेखन पद्धत(रोमन अंकचिन्हे अथवा संख्याचिन्हे ) बेरीज, वजाबाकी, गुुुणाकर व भागाकार इत्यादी अकडेमोडीची उदाहरणे सोडविण्यासाठी उपयोगी नाही. )
0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या अंक चिन्हांना ब्रिटिश एनसायक्लोपीडिया ‘ हिंदू-अरेबिक न्यूमेरल्स ‘ असे म्हटले आहे. त्याापुढील खुुलाश्यात असे म्हटले आहे की, ही अंकचिन्हे मुळात हिंदू
( भारतीय ) अंकचिन्हे असून भारतातून मसाल्याचे पदार्थ अरब व्यापाऱ्यांनी युरोपमध्ये आणतांना हिशेबासाठी ही अंकचिन्हे युरोपात आणली. [म्हणजे मुळात ही अंकचिन्हे भारतीय( हिंदू ) आहेत.]
सध्या ही अंकचिन्हे आंतरराष्ट्रीय अंकचिन्हे म्हणून मान्यता प्राप्त आहेत. भारतीय संविधानातही याच अंकचिन्हांना मान्यता देण्यात आली आहे.
0, 1, 2, 3, 4, 5,…. ही अंकचिन्हे बक्षाली येथे सापडलेल्या भूर्जपत्रांवर ( इसवीसन पूर्व सुमारे अडीचशे वर्षे ) आढळून येतात. ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर असणाऱ्या चतुर्भुज मंदिरात असलेल्या शिलालेखात हीच अंकचिन्हे आहेत.(इसवीसनाच्या सातव्याशतकात)
आज आंतरराष्ट्रीयस्तरावर उपयोगात असलेली अंकचिन्हे भारतीय आहेत.
दशमान पद्धती
दहा अंकचिन्हे वापरून लिहिलेल्या संख्या म्हणजे दशमान पद्धती होय. संख्या लेखनामधील प्रत्येक अंकाला एक दर्शनी किंमत असते आणि एक स्थानिक किंमत असते. संख्या वाचन करताना अंकांच्या स्थानिक किमतीनुसार वाचन केले जाते. एकक, दशक, शतक, हजार, लाख, कोटी, अब्ज, महापद्म, परार्ध,….. हे शब्द आपण मराठीत उपयोगात आणतो. इंग्रजी भाषेत Unit, tens, hundreds, thousands, crores, millions, billion, trillion, quadrillion… इत्यादी पारिभाषिक शब्दांचा उल्लेख होत असतो हे आपल्याला माहीत आहेच.
अंशीत दशमान संज्ञा दशांश, शतांश, सहत्रांश..आहेत. मॅट्रिक पद्धतीमध्ये डेसी, सेंटी, मिली,
मायक्रो, नॅनो, पिको,…. इत्यादी शब्दांचा उपयोग केला जातो. गुणित दशमान संज्ञा डेका, हेक्टो, किलो, मेगॅं, गिगॅं , टेरँ, पेंटा, हेक्झॅ, जेट्टा , योट्टा, इत्यादी शब्दांचा उपयोग केला जातो. हे पारिभाषिक शब्द ही दशगुणोत्तरी संज्ञा आहेत.
प्राचीन भारतीय गणित ग्रंथांमध्ये पुढील दशगुणोत्तरी संज्ञा (शब्द) आढळून येतात. एकम, दश, शत, सहस्र, दशसहस्त्र (अयुत), लक्ष, दशलक्ष ( प्रयुत ) कोटी, दशकोटी (नियुत), अब्ज (अर्बुद), दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, ऋद्धि, दशऋद्धि, सिद्धी, दशसिद्धी, निधी, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशाबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, वव, दशवव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भार, दशभार, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित दशअमित, गोल, दशगोल, परिमित दशपरिमित, अनंत, दशअनंत (दशअनंत म्हणजे एकावर शहाण्णव शुन्ये).
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची