मुंबई – गुगल मॅपमध्ये एक नवे फिचर येत आहे, ज्याच्या आधारावर स्वतः युझर्सही गुगल मॅपमध्ये बदल करू शकणार आहेत. अर्थात गुगल मॅपमध्ये लवकरच एडीट ऑप्शनची सुविधा मिळणार आहे. त्या मदतीने युझर्स आपल्या गल्लीबोळाचे, परिसराचे, अज्ञात वस्त्यांचे नावही याठिकाणी टाकू शकतील. आणि चुकीची माहिती असल्यास डिलीटही करता येणार आहे.
जर एखाद्या गल्लीला तुम्ही नवे नाव दिले तर तुम्हाला फक्त एक पिन ड्रॉप करावे लागेल. त्यानंतर ज्या गल्लीला कधीच कुठले नाव नव्हते तिला नवे नाव मिळेल. तुम्ही दिलेले नाव गुगलतर्फे व्हेरिफाय केले जाईल.
जर हे नाव योग्य असेल तर सात दिवसांमध्ये ते गुगलकडून अपडेट केले जाईल. गुगल मॅपने या नव्या अपडेटच्या माध्यमातून अज्ञात बोळींचे नामकरण करणे शक्य होणार आहे. त्याचा लोकांनाच फायदा होणार आहे. जे रस्ते आणि वस्त्या लोकांना माहिती नाही ते देखील मॅपवर आणण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. या व्यतिरिक्त गुगल मॅप आणखी एक नवे फिचर आणणार आहे ज्यात युझर्स फोटोचे नामकरण करू शकणार आहे.
८० देशांमध्ये मिळेल नवे फिचर
गुगल ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये मॅप्सच्या या नव्या फिचरची माहिती शेअर केली. त्यात जगातली ८० देशांमध्ये हे फिचर लॉन्च करणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. सध्या गुगल मॅपवर केवळ एखाद्या जागेसाठी पिन मार्क करण्याची सोय आहे.