येवला – सत्यशोधक संघटनेच्या वतीने शहरात परंपरे प्रमाणे बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महात्मा फुले नगरात सदर कार्यक्रम झाला. प्रारंभी बळीराजा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित परदेशी हे होते. प्रा. रणजित परदेशी, अड. दिलीप कुलकर्णी, सरोज कांबळे, शिवाजी वाबळे, कॉ. भगवान चित्ते यांची प्रसंगोचीत भाषणे झाली. प्रास्ताविक आनंद चित्ते यांनी तर सूत्रसंचालन नितीन संसारे यांनी केले.
कार्यक्रमास योगेंद्र वाघ, माणिक आव्हाड, संजय जाधव, रोहिणी चित्ते, संगीत आव्हाड, शकुंतला चित्ते, मंगला खरात, अरविंद संसारे, अण्णा पडवळ, संदिप खरात, चंद्रभागा अस्वले, धोंडीराम पडवळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.