येवला – तालुक्यातील विना शिधापत्रिकाधारक पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत प्रति व्यक्ती प्रति माणसी पाच किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोविड -१९ महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज (एएनबीपी) अंतर्गत देशभरातील दिव्यांग व्यक्तींसह रेशन कार्ड नसलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करून तालुका स्तरावर शिल्लक असलेल्या अन्नधान्यातून अन्नधान्याचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रांताधिकारी सोपान कासार, तहसिलदार रोहिदास वारुळे, पुरवठा उपलेखापाल बाळासाहेब हावळे, पुरवठा निरीक्षक प्राजक्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांचे हस्ते या योजनेंतर्गत तालुक्यातील धामणगाव, पांजरवाडी, सातारे, निळखेडे, राजापुर, शिरसगाव, विसापूर, वाघाळे, रेंडाळे, देवठाण येथील एकुण ११ दिव्यांग कुटुंबातील ६४ सदस्यांना एक महिन्यासाठी प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.