येवला – तालुक्यातील बाभुळगाव व नगरसूल येथील कोरोना कक्षास खासदार डॉ. भारती पवार यांनी भेट देवून पाहणी केली. कक्षातील कोरोनाग्रस्त रूग्णांसह तहसीलदार रोहिदास वारुळे, गट विकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. शरद कातकडे यांचेशी खासदार पवार यांनी चर्चा केली. काही सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाने शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावे, माझ्यासह भाजपा कार्यकर्तेही मदतीसाठी सज्ज आहेत. कुणास काही अडचणी भासल्यास त्यांनी स्थानिक पदाधिकार्यांबरोबरच मला केव्हाही संपर्क करावा, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले. या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ नेते बाबा डमाळे पाटील, तालुका अध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, प्रा. नानासाहेब लहरे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, डॉ. उमेश काळे, राजेंद्र परदेशी, भीमाजी सावंत, मयूर मेघराज आदी उपस्थित होते.
दरम्यान, येवला दौर्यावर आलेल्या खासदार डॉ. भारती पवार यांचेकडे, नागडे- कोटमगाव रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागडे ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली.