नाशिक – येवला तालुक्यातील बाभुळगांव येथे ग्रामसेवकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला. बिल काढण्यासाठी १० टक्के प्रमाणे ५० हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याने ही कारवाई करण्यात आली.
ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यांनी साईराज इलेक्ट्रीक वर्क्सच्या ठेकेदाराकडून ही मागणी केली होती. साईराज इलेक्ट्रीकने बाभुळगाव येथे बारा मिटर उंचीच्या इलेक्ट्रीक पोल बसविण्याचे कामाचे उर्वरीत १५८००० रुपयाचे चेक काढावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ग्रामसेवकाने एकुण कामाचे १० टक्के प्रमाणे त्यांच्याकडे मागणी केली. पण, ५० हजार रुपये तडजोडी अंती ठरले. यानंतर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे प्रयत्न करत असतांना ग्रामसेवक अडकले.