येवला : तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
संपूर्ण देशात केंद्र सरकारने संसदेमध्ये घाईघाईने तीन कृषि विधेयक मंजूर करुन घेतली. सदर विधेयके ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी अशी आहे. त्यामुळे सदर विधेयके रद्द करण्यात यावी यासाठी संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत अनेक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास सह्या करुन विरोध दर्शविला. सदर स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख यांनी दिली.
स्वाक्षरी मोहीम राबवीते वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे,सुरेश गोंधळी,अॅड. दिलीप कुलकर्णी,तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख,शहराध्यक्ष प्रीतम पटणी,शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार,कैलास घोडेराव,नंदकुमार शिंदे दत्तात्रय चव्हाण,आबासाहेब शिंदे, झेड. डब्ल्यू. ताडगे, मुसा शेख, गणेश डिकले, अमित पटणी आदींसह पदाधिकारी दिवसभर तळ ठोकून होते.