येवला – केंद्रातील सर्वसामान्य, शेतकरी, कामगार विरोधी सरकारच्या विरोधात होणार्या आंदोलनात डाव्या, पुरोगामी, समाजवादी व राष्ट्रप्रेमी पक्ष, संघटनांनी आपले क्रांतीकारी योगदान द्यावे, असे प्रतीपादन ज्येष्ठ विचारवंत कॉ. रणजीत परदेशी यांनी केले. देशाची संपत्तीचे खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. कृषी संबंधीत काळे कायदे तयार करून शेती व शेतकरी संपवण्याचा घाट घातला गेल्याचा आरोपही कॉ. परदेशी यांनी यावेळी केला.
क्रांतीज्योती महिला सभेच्या वतीने शहरातील मित्रविहार कॉलनीतील क्रांतीज्योती निवास येथे महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका कॉ. चहाबाई अस्वले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत कॉ. रणजीत परदेशी, सामाजीक कार्यकर्त्या निर्मला कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रारंभी अतिथींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतीमेचे पूजन केल्या गेले.
कॉ. भगवान चित्ते यांनी, कामगार कायद्यांबाबत बोलतांना केंद्रातील सरकार भांडवलदार धार्जीणे असून कामगारांनी संघटीत होवून लढा देण्याची गरज प्रतीपादीत केली. अॅड. दिलीप कुलकर्णी यांनी शेतकरी प्रश्नांवर बोलतांना केंद्राच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. चंद्रकांत साबरे, निर्मला कुलकर्णी, चहाबाई अस्वले यांची प्रसंगोचित भाषणे झाली.
क्रांतीज्योती महिला सभेच्या वतीने सरोज काबंळे यांनी दिल्लीत सुरू असणार्या शेतकरी आंदालनाला पाठींबा जाहिर केला. उपस्थितांनी त्यास जोरदार समर्थन दिले. शेतकरी लढ्याला दलित, शोषीत, कामगार, महिलांसह बहुजनांनी पाठींबा देवून लढा यशस्वी करण्याचे आवाहनही कांबळे यांनी यावेळी केले.
सूत्रसंचलन नितीन संसारे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद संसारे यांनी केले. कार्यक्रमास नंदू गायकवाड, सतिष संसारे, सय्यद कौसर, आयुब शाह, प्रणव कोकणे, योगेंद्र वाघ, मोबीन शेख, जितेश पगारे, शरद अहिरे, रशिद अख्तर, प्रियंका संसारे, सुनीता जाधव, जुबेर सौदागर, नचिकेत जाधव, स्वप्नील सोनवणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.