येवला – तालुक्यात शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा येवला तालुका गटनिहाय संवाद दौरा संपन्न झाला.
जिल्हा परिषद अध्यक्ष नाशिक बाळासाहेब क्षिरसागर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नेते संभाजी पवार, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सौ. सुरेखाताई दराडे, समाजकल्याण सभापती सौ. सुशीला ताई मेंगाळ, येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उपसभापती मंगेश जाधव आदी सदर दौर्यात सहभागी झाले होते. तालुक्यातील पाटोदा, नगरसुल, राजापुर, अंदरसुल, मुखेड या पाचही गटातील झालेल्या या संवाद दौर्यात लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी जनतेशी थेट संवाद साधला.
जिल्हा परीषद अध्यक्ष क्षिरसागर यांनी, तालुक्यातील कामे त्वरीत मार्गी लावली जातील. ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ब्रीदनुसार शिवसेना जिल्हाभर काम करणार असल्याचे सांगीतले. यावेळी विविध योजनांचा व विभागांचा आढावाही त्यांनी घेतला. महाराष्ट्र सरकारची कामे घराघरात पोहचवून ठाकरे सरकार जनतेचे सरकार आहे, असा विश्वास जनतेत निर्माण झाला पाहीजे याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाप्रमुख पाटील यांनी सेना पदाधिकार्यांना केली.
संवाद दौर्यात उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरनारे, उपतालुकाप्रमुख पुंडलीक पाचपुते, विठ्ठल महाले, अमोल सोनवणे, झुंजारराव देशमुख, गणेश पेंढारी, अंनत आहेर, विकास गायकवाड, भागीनाथ थोरात, रावसाहेब नागरे, अशोक आव्हाड, विठ्ठलराव अडसरे, कांतीलाल साळवे, बाळासाहेब पिंपळकर, दत्तु देवरे, साहेबराव बोराडे, चंद्रभान नाईकवाडे, सुयभान नाईकवाडे, शिवाजी बोराडे, जनार्दन भवर, तुळशीराम घनघाव, शाम गुंड, भास्कर बोराडे, विठ्ठल घोरपडे, विठ्ठल चौगुले, अमीन नाईकवाडे, ज्ञानेश्वर बुल्हे, भाऊराव हांडोरे, दत्तू वाकचौरे, काका पडवळ आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.