येवला – नगरपालिकेने शहरातील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, यासाठी श्राध्द आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केसही काढले. याअगोदर अमोल गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे पालिकेला इशारा दिला होता. त्यासाठी रितसर पालिका मुख्याधिकारी निवेदनही दिले होते. पण, त्यावर काही कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.
येवला शहरात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून नागरीकांना पायीचालणे देखील मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडून पाण्याचे डबके साचले आहे. येणारी – जाणारी वाहणे पादचार्यांच्या अंगावर पाणी उडवतात. रस्ता प्रश्नी लोकप्रतिनिधींची उदासिनता दिसून येते. तर रस्ताकामे होतांना त्यांचा दर्जा राखला गेला नाही. त्यामुळे ते लगेच खराब झाले. आता हे रस्ते दुरुस्त व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.