येवला – येवला तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी हरिश्चंद्र जाधव, कार्यवाहपदी दिनेश धात्रक यांची तर व्हा.चेअरमनपदी दिपक खरे यांची एकमताने निवड
आवर्तन पध्दती नुसार तत्कालीन चेअरमन चांगदेव खैरे, कार्यवाह साहेबराव घुगे व व्हा.चेअरमन कालिंदी आहेर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागांवर चेअरमन, कार्यवाह, व्हा.चेअरमन यांची निवड करण्यासाठी मंगळवारी संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.
सदर सभेत चेअरमनपदी हरिश्चंद्र जाधव यांच्या नावाची सूचना वाल्मिक नागरे यांनी मांडली तर कार्यवाहपदी दिनेश धात्रक यांच्या नावाची सूचना साहेबराव गायकवाड यांनी मांडली व व्हा.चेअरमनपदी दिपक खरे यांच्या नावाची सूचना अरविंद जोरी यांनी मांडत सदर निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
सदर निवडीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राधिकृत अधिकारी वाय. एम. उगलमुगले यांनी काम पहिले. निवडणूक कामात सचिव प्रशांत थोरात यांनी सहकार्य केले.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन हरिश्चंद्र जाधव, कार्यवाह दिनेश धात्रक, व्हा.चेअरमन दिपक खरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु असून यापुढेही सातत्याने विश्वासपूर्ण वाटचाल सुरूच राहील अशी ग्वाही चेअरमन जाधव सर, कार्यवाह धात्रक सर, व्हा.चेअरमन खरे सर यांनी दिली. सदर निवडी प्रसंगी सन्माननीय संचालक माणिकराव मढवई, मच्छिंद्र आवारे, प्रदीप पाटील, मगन वारुळे, दत्तात्रय साताळकर, प्राचार्य अंबादास सालमुठे, सुनिल मेहेत्रे, मुख्याध्यापक पंडित मढवई, अंबादास मगर, जनार्दन गंडाळ, मंगेश नागपुरे, सुधीर चेमटे, राजाराम बिन्नर, भिमराज मुंगसे, भगवान तेलोरे, देसले सर आदींसह सभासद बंधु-भगिनी उपस्थित होते.