येवला – येथील पैठणी जगभर प्रसिद्ध आहे. पण, आता या पारंपारिक पैठणीच्या डिझाइनमध्ये नवे नवे बदल करण्यात आले आहे. या नव्या बदलात जंगल व वन्यप्राणी पैठणीवर दिसणार आहे. या अगोदर पैठणीवर नाजूकशी बुट्टी, कमळाची फुले, पदरावरचा नाचरा मोर अन आकर्षक रंगसंगती होती. ती कायम राहणार आहेच. पण, नव्या पैठणीत सिंह, वाघ, हरिण, कोल्हे, बगळे, वानर, झाडावर असलेले पक्षाचे घरटे आणि त्यात असलेली पिल्ल, फुलपाखरु, गरुड अशी विविध प्रकाराची पक्षी व प्राणी असणार आहेत.
पारंपारिक पैठणीला पंधरा दिवस लागत असले तरी या नव्या पैठणीला पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागतो. ग्राहकांच्या आवडी आणि मागणी नुसार आता अशा प्रकारच्या पैठणी तयार होऊ लागल्या आहेत.आणि या पैठणीची किंमत सुध्दा चार लाख रुपयां पर्यंत असल्याचे पैठणी विक्रेते सांगतात. महिलांच महावस्त्र म्हणजे पैठणी, प्रत्येक महिलेला ती हवी हवीशी वाटते.या पैठणीच्या ट्रेंड मध्ये आता बदल होतांना दिसत आहे.
येवल्यात घराघरात हातामागावर तयार होणा-या पैठणीवरचा हा VDO बघाच