– महाराजा थाळी – ११००
– मान्यवर थाळी – २५००
येवला – पैठणीच्या गावातून फिरतांना पावलोपावली जाणवते ते पैठणीचे शोरूम आणि विणकर..आता यासोबतच सावजी मटणासाठी देखील पैठणीचे हे गाव लोकप्रिय होत आहे. येथे मांसाहारी खवव्ययांची वाढलेली संख्या पाहून आता आगळीवेगळी नॉनव्हेज महाराजा थाळीची क्रेज तयार होऊ लागली आहे. खाऊन तृप्ती मिळेल अशा विविध ११ प्रकारच्या पदार्थांची जम्बो थाली येथे मेघा बाकळे यांच्या कल्पकतेने तयार होऊ लागली असून तिची चर्चा देखील होत आहे.
येवला तर पैठणीच्या निमित्ताने येणाऱ्या परगावच्या पर्यटकांमुळे आता सावजी मटणासाठी देखील प्रसिद्ध होऊ लागले आहे. या बदलत्या प्रवाहात आपल्याकडे काहीतरी कौशल्य आहे त्याचा उपयोग करण्याच्या हेतूने आपल्या आईकडून रेसिपी शिकलेल्या मेधा बाकळे यांनी स्वतःचे आगळेवेगळे हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा चंग बांधला. त्याचे पती निलेश बाकळे आणि स्वादिष्ट मांसाहारी पदार्थ बनविण्याची कला असलेल्या पत्नी मेघा यांना सोबत करत स्वतःचे मान्यवर नावाचे हॉटेल सुरू करून फॅमिलीसाठी स्पेशल मांसाहारी थाळी येथे बनवत लक्ष वेधले आहे. या मान्यवर हॉटेलमध्ये मान्यवरांसाठी भेटणाऱ्या महाराजा स्पेशल थाळीची किंमत केवळ ११०० रुपये ठेवण्यात आली आहे.
त्या तुलनेत मिळणारे पदार्थ,त्याची रुचकारकता नक्कीच समाधानकारक आहे. अर्धा टेबल व्यापून टाकणाऱ्या या थाळीत ५ पिस असलेले मटन,चिकन,ग्रीन चिकन, चिकन ऑन फायर,मटन खिमा जामून,मटन फ्राय,एक पीस फिश,पाच चपाती,पाच भाकरी,पाच पापड,मसाला राईस आणि दोन वाटी रस्ता असे तब्बल ११ पदार्थ मिळणार आहे.एवढी मोठी थाळी पाच ते सहा जण आरामात खाऊ शकतात व तसेच मान्यवर थाळी देखील शुरू केली आहे. त्यात तब्बल १० ते १२ माणसं जेवण करतील व त्याची किंमत २५०० रुपये आहे. त्यातील चवदारपणा आणि नावीन्यपूर्णता सहजपणे पैसे वसूल झाल्याचा भास करून जाते. याशिवाय बाकळे यांनी आगळीवेगळी मटन थाली,मटन खिमा जामुन,ग्रीन चिकन,चिकन ऑन फायर थाली देखील दोन किंवा तिघांसाठी पुरेल अशा पद्धतीने सुरू केली आहे. विशेषतः विदर्भ आणि येवल्यात प्रसिद्ध असणाऱ्या सावजी प्रकारात स्वतः मेघा बाकळे हे पदार्थ बनवत आहे.विशेष म्हणजे घरचाच बनवलेला मसाला वापरून सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने बनवून चवदारपणा असलेल्या या थाळीची लजतच लय भारी असेच म्हणावे लागेल.
पैठणी सोबत येवल्याचे मटण देखील सर्वदूर पोहोचले
“सोलापूरला असताना आई बनवत असलेल्या मांसाहारी पदार्थांची चवच न्यारी होती.मी ही कला आत्मसात केली असून येवल्यात आल्यावर माझे पती व कुटुंब तसेच त्यांचे मित्रपरिवाराला देखील हे चवदार पदार्थ आवडले.त्यातूनच स्वतःची हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.स्पेशल थालीला मिळणारा प्रतिसादाने पैठणी सोबत येवल्याचे मटण देखील सर्वदूर पोहोचले याचा आनंद आहे.”
–मेघा निलेश बाकळे,येवला