येवला – नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने दोघा दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून चोरीच्या सहा दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत. गुप्त बातमीवरून रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या पथकाने मनमाड परिसरातुन राजू पंडित अहिरे (वय २७) रा. आंबेडकर चौक, मनमाड ता. नांदगाव तसेच येवला शहरातून नवाजीश अकिल शेख (वय २१) रा. मोमीनपुरा, येवला यांना सापळा रचुन ताब्यात घेतले. तपासात त्यांनी येवला शहर व मालेगाव कॅम्प येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तर सदर संशयीत आरोपींच्या ताब्यातून १ लाख ६ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.