येवला – येवला शहरासह परिसरात पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली. नगरसूल,सायगाव, अंदरसूल या गावातही पाऊस पडला. त्यामुळे शेतात काढून ठेवलेली कापूस,कांदे पीकांना नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात पावसाने दांडी मारली. त्यानंतर आता त्याने पुन्हा हजेरी लावत नुकसानही केले. डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता याअगोदर हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तो आता किती,केव्हा व कसा पडतो व काय नुकसान करतो याची भीती आहे.