येवला : येथील सेवाभावी संस्था संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समिती येवला यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या “जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कार” चे आज वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर सभागृह शिंपी गल्ली येथे उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थान प्रसिध्द कापडाचे व्यापारी श्री. सोमनाथशेठ हाबडे भूषविले, विशेष निमंत्रित म्हणून साहित्यिक कवि व्याख्याते श्री. नंदनजी रहाणे तर उद्घाटन गुरूद्वारा प्रबंधन कमिटी येवलाचे प्रधान श्री. बलरामसिंगजी संधु यांनी केलेव व दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून नगगराध्यक्ष श्री. 1बंडु क्षिरसागर, मा.नगरअध्यक्ष श्री. भोलानाथ लोणारी, प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री प्रभाकर झळके, श्री. कुणाल दराडे, श्री. किशोर सोनवणे, श्री. धनंजय कुलकर्णी, श्री. सुहास भांबारे, श्री. जयवंत खांबेकर, श्री. संजय (बापु) कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीचे वतीने जिल्हास्तरीय संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्ति व संस्थेस सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवी संस्था पुरस्कार धडपड मंच अध्यक्ष श्री. प्रभाकर झळके सर, धार्मिकरत्न ह.भ.प. निवृत्ती चव्हाण (अंगणगांव ता.येवला) व श्री. दत्तात्रय जाधव (येवला), सामाजिक रत्न श्री. सतिष भांबारे (नाशिक) श्री. शाम सारंगधर (श्रीरामपुर), श्री. अरविंद टापसे (लासलगांव) श्री. महेश काबरा (येवला), शैक्षणिकरत्न श्री. कुणाल दराडे (येवला) श्री. प्रविण बनकर (येवला), कलारत्न पुरस्कार श्री. चेतन बेदडे (मोरवाडा, ता.जव्हार) श्री. श्रीकांत खंदारे (येवला), व्यसनमुक्तीरत्न श्री. संजय (बापू) कुलकर्णी (सावरगांव ता.येवला), समाज प्रबोधनरत्न श्री. अजय सोनवणे (मनमाड) श्री. संतोष विंचू (पत्रकार दै.सकाळ) श्री. चेतन कोळस (प्रतिनिधी Z24 तास येवला), आरोग्य रत्न श्री. किरण वाटारे (नाशिक), उद्योगरत्न श्री. विकास काकडे (मनमाड) आदी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून समितीच्या कार्यकर्त्याचे कौतुक केले. सोहळा उत्कृष्ठपणे पाराडण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष मुकेश लचके यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुरूषोत्तम रहाणे तर आभार प्रदर्शन राजेंद्र गणोरे यांनी केले. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष मुकेश लचके, राम तुपसाखरे, राजेंद्र कल्याणकर, पुरूषोत्तम रहाणे, पांडुरंग खंदारे, राजेंद्र गणोरे, कवित माळवे, अमोल लचके, तुषार भांबारे, संदीप लचके, बळीराम शिंदे, रमाकांत खंदारे, मधुसुदन शिंदे, अक्षय निरगुडे, सोमनाथ शिंदे, आबा सुकासे, वरद लचके, सुनिल टिभे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.