दराडे : उत्तर-पूर्व भागात २० नव्या बंधार्याना तर ९ च्या दुरुस्तीला मान्यता
येवला : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण असलेल्या तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला मोठ्या प्रमाणात जलसंधारणाच्या कामांची गरज आहे. याचमुळे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे या भागात बंधार्यांची मागणी केली होती. त्यानुसार या उत्तर पूर्व भागात 20 नव्या बंधार्यांना मान्यता देताना 9 बंधार्याच्या दुरुस्तीला ही त्यांनी परवानगी दिली असून सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली.
आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या भरीव निधीतून या भरीव विकास कामे सुरू आहेत.विशेषता युवा सेनेचे विस्तारक कुणाला दराडे यासाठी ठोस पाठपुरावा करत असल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामांना चालना मिळत आहे. हा भाग पूर्णतः अवर्षणप्रवण असून या भागात पडलेले पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते.परिणामी डिसेंबर नंतर येथे टंचाई जाणवते,त्यामुळे छोटे-मोठे पाझर तलाव,बंधारे,सिमेंट बाध होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती.त्यानुसार याचा प्रस्ताव करून श्री गडाख यांच्याकडे सादर करून निधी मंजुरीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार त्यांनी राजापूर येथे 8 सिमेंट काँक्रीट बंधार्याच्या कामांना मंजूरी दिली आहे.
याशिवाय ममदापूर येथे पाच,रहाडी येथे 2,खरवडी येथे 2 व सोमठाणजोश येथे 3 अशा एकूण 20 सिमेंट काँक्रीटीकरण बंधार्याच्या कामांला सुमारे 12 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर केला आहे.
याशिवाय भारम येथे सिमेंट काँग्रेट बांध व साठवण तलाव,रहाडी येथे दोन गावतळे,नगरसुल येथे साठवण बांध व गावतळे,डोंगरगाव येथे साठवण तलाव तर ममदापूर व पाटोदा येथे साठवण तलावाच्या दुरुस्तीला सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या कामांना लवकरच तांत्रिक मान्यता मिळून प्रारंभ केला जाणार आहे.
उत्तर पूर्व भागात जेवढी जलसंधारणाचे अधिक कामे होतील तेवढी शेतकरी, ग्रामस्थ,वन्यजीवांची होणारी हाल थांबणार आहे.या भागातील महत्वपूर्ण देवणाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे ठोस प्रयत्न सुरू असून आम्हीही पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आम्ही आग्रही आहोत. याशिवाय या भागातील छोट्या-मोठ्या बंधार्यांच्या कामाचेही प्रस्ताव तयार केले असून त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा सुरूच आहे आगामी काळात मोठ्या प्रमाणात कामे या भागात झालेले दिसतील असा विश्वास युवा नेते कुणाल दराडे यांनी व्यक्त केला आहे.
कुठंही कमी पडणार नाही
पाणी हे सर्वस्व आहे. राजापूर, ममदापूर, भारम, रहाडी या भागात जलचळवळ उभी केली तर शेती,वन्यजीव व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे शक्य त्या मार्गाने योजना व कामे मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.मंत्रीमहोदय देखील सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने प्रास्तवित कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कुठंही कमी पडणार नाही.
–कुणाल दराडे, विस्तारक, युवा सेना