येवला – येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनो संसर्ग वाढता असल्याने विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊन अधिक संसर्ग वाढु नये यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातही विसर्जनाकरीता गणेश कुंडा व्यतीरीक्त इतर ठिकाणीही व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाण मुर्ती संकलन केंद्र निश्चत केले आहेत.
असे आहे मुर्ती संकलन केंद्र
येवला शहरात मुर्ती संकलन केंद्र गंगा दरवाजा, काळा मारुती रोड, खांबेकर खुंट, आझाद चौक, जब्रेश्वर खुंट या ठिकाणी तर मुर्ती विसर्जन ठिकाणे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर घाट (विंचुर रोड), गणेश कुंड (गंगा दरवाजा), शनिपंटागण, टिळक मैदान, काकड हॉस्पीटल जवळ (पारेगाव रोड), गोरोबा काक मंदीर जवळ (विठ्ठलनगर), साईबाबा मंदीर जवळ (बदापुर रोड) प्रशासनाने निश्चित केले आहेत.
गर्दी करु नये
पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर घाट परीसरात गर्दी होऊ नये यासाठी सदर परीसरात मुर्ती विसर्जन करीता नागरीकाना कुंडा जवळ जाण्यास मज्जाव करण्यात आलेला असून सदर ठिकाणी येणारे भावीक यांनी श्रींची मुर्ती बँरिकेटींग जवळ असलेले स्वंयसेवक अथवा नगरपरीषद कर्मचारी यांच्याकडे विसर्जनासाठी द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहेत.
विसर्जन ठिकाणी आरती करता येणार नाही
विसर्जन ठिकाणी आरती करता येणार नसल्याने घरीच श्रीमूर्तींची आरती करून घ्यावी, विसर्जनासाठी एक किंवा दोघांनीच यावे, मास्क, सॅनीटायजर वापरून सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे, विसर्जना व्यतीरिक्त इतर नागरीकांनी गर्दी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
ग्रामीण भागातही नियोजन
तालुक्यातील ग्रामीण भागात अंदरसुल, आडगाव रेपाळ, सायगाव, सावखेडे, गारखेडे, विसापूर, एरंडगाव बुद्रुक, आडसुरेगाव, उंदीरवाडी, साताळी, कासारखेडा, नेवरगाव, धामोडे, पाटोदा, सत्यगाव, सातारे, नांदूर ग्रामपंचायत कार्यालयात मूर्ती दान-संकलन केंद्र प्रशासनाने केले असून पाटोदा येथील मनमाड नगरपालिका तलाव या व्यतीरिक्त गावातील ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरी मूर्ती विसर्जन नैसर्गीक ठिकाण पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहेत.