येवला – येवला पैठणी विणकर महिलांकरीता भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र बुनकर प्रकोष्ठ आयोजित व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने येवला शहरात २३ व २४ डिसेंबर या दोन दिवसीय कामगार शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन डॉ.हेडगेवार सभागृह, मर्चंट बँक येथे करण्यात आले होते. या दोन दिवसीय प्रशिक्षणवर्गाच समारोप दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी खा. डॉ. भारती पवार यांनी महिलांनी संघटित होऊन काम करण्याची गरज आहे, महिला सक्षम होणे ही सशक्त भारतासाठी गरजेचे असून जास्तीत जास्त महिलांनी नवीन व्यवसायात योग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे व आपणास कुठलीही समस्या आल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपण उभारलेल्या व्यवसायाची व्यवस्थित मार्केटिंग करून आपले प्रॉडक्ट हे सर्वांपर्यंत कसे पोहचतील याकडेही अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचेही सांगितले. त्याचप्रमाणे वस्त्र मंत्रालयाशी निगडित विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात २७०० विणकरांना भारत सरकारचे “विणकर ओळखपत्र” दिले अशून आगामी काळात उर्वरित राहिलेल्या विणकर बांधवांचे ओळखपत्र काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वसनही त्यांनी यावेळी दिले.
या प्रशिक्षणवर्गाचे आयोजन मनोज दिवटे यांनी केले तर संयोजक उत्तर महाराष्ट्र भाजपा बुनकर प्रकोष्ठ हे होते. प्रशिक्षण वर्गाचा समारोप चेअरमन अरुण बापू काळे, ज्येष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी, येवला भुषण प्रभाकर झळके सर, डॉ.उमेश काळे,भाजपा शहराध्यक्ष तरंग पटेल, विशाल काथवटे, पंकज पहिलवान, गाडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
असे झाले प्रशिक्षणवर्ग
दोन दिवसीय सत्रामध्ये श्रीमती सुनंदा सोनवणे आर्थिक सहायता केंद्र नाशिक जिल्हा अधिकारी यांनी बँक प्रणाली बाबत श्रीमती स्मिताताई जोशी (महिला सबलीकरण फाउंडेशन नाशिक) यांनी महिला साक्षरता या विषयावर श्रम व रोजगार मंत्रालयाच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती सारिका डाफरे यांनी महिला सबलीकरण व कामगार कायदे यासंदर्भात तर
दुसऱ्या दिवसातील सत्रामध्ये श्रीमती शुभांगी दप्तरे (जळगाव पीपल्स बँक जळगाव बचत गट विभाग प्रमुख) यांनी महिला बचत गटांच्या बाबत मनोज दिवटे यांनी महिला उद्योजिका व यशोगाथा याबाबत श्रीमती माधुरी पाटील ल्युका इंडस्ट्रीज चोपडा यांनी कामगार क्षेत्रातील समस्या व उपाय याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती अनिता वाघ (यशदा पुणे व आय.आर.डी. मास्टर रिसोर्स पर्सन, प्रमुख बंडोपंत ठेंगडी कामगार शिक्षा बोर्ड) यांनी महिला आज आणि उद्या कोणते उद्योग करू शकता व त्यातून स्वतःचे जीवनमान स्तर कशा प्रकारे उंचावू शकता यासंदर्भात मार्गदर्शन केले.