येवला – केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरु करुन कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव द्यावा, तसेच विक्री झालेल्या कांद्यापोटी कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान देण्याची मागणी प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सदर निवेदन पाठवण्यात आले. केंद्र सरकारने कांदा व्यापार्यांना स्टॉक लिमीट ठेवले तर सलग पाच दिवस कृषी मार्केट बंद राहिल्या मुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणात झाली. नवीन लाल कांदा बाजारात आला तर केंद्र सरकाने बाहेरील देशातुन कांदा आयत केल्यामुळे प्रचंड प्रमाणात कांदा भावात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. असे सदर निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदींना पाठवलेल्या आहेत.