येवला – जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा दौर्यात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक शहरातील विश्राम गृहात संपन्न झाली. या बैठकील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष माजी आमदार मुजहफर हुसेन हे उपस्थितीत होते.
हुसेन यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कामकाजाचा व कोरोना संसर्ग आजार परिस्थितीबाबत चर्चा केली. तालुक्यात पक्ष संघटन वाढवून पक्षाची ध्येयधोरणे व कार्य जनतेपर्यंत पोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आगामी काळात येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सुचनाही केल्या.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे व सुरेश गोंधळी उपस्थितीत होते. अॅड. समीर देशमुख यांनी, शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या कामकाजाचा अहवाल सादर केला. शहराध्यक्ष प्रीतम पटणी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष मुसा शेख, युवक अध्यक्ष मंगल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नानासाहेब शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन विलास नागरे यांनी केले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्ते, धर्मराज जोपळे, नंदकुमार शिंदे, सुखदेव मढवई, चांगदेव खैरे, दत्तात्रय चव्हाण, संदीप मोरे, सतीश पुणेकर, रावसाहेब लासुरे, शिवनाथ खोकले, अण्णा पवार, गणेश ढिकले, बाबासाहेब शिंदे, जयप्रकाश वाघ, दत्तात्रय चव्हाण, अमित पटणी, मुकेश पाटोदकर, इक्बाल पटेल, राजे आबासाहेब शिंदे, कार्तिक बनकर, महेश भोरकडे, आशा झाल्टे, सुनील काळे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.