येवला – तालुक्यातील पाटोदा येथे दहेगाव रोड असलेल्या ऋषिकेश हॉटेल समोर एक वर्षापूर्वीच्या उसनवार घेतलेल्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा जीव गेला. या घटनेत खूनाचा गुन्हा दाखल झाला येवला तालुका पोलिसांनी दाखल केला आहे. या वादात ठाणगाव येथील संजय रामचंद्र शिंदे (४५ ) याचा मृत्यु झाला आहे.
या घटनेत मयत शिंदे व पाटोदा येथील संशयित आरोपी अरुण वाळूबा कुराडे (४७) या दोघांमध्ये सुमारे एक वर्षापूर्वीच्या उसनवार घेतलेल्या एक हजार रुपये वरून हा वाद झाला. संशयित आरोपी अरुण कुऱ्हाडे याने मयत संजय शिंदे यास उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात मयत संजयला मार लागल्याने त्यात त्याचा जीव गेला. या घटनेची फिर्याद अरुण रामचंद्र शिंदे यांनी दिली असून येवला तालुका पोलिसांनी भादवी ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे आदींनी भेट दिली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी येवला तालुका पोलीस करत आहेत