यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.ए.तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता एस.एम.पाटील, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांच्या हस्ते स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर आणि पेव्हरब्लॉक बसविणे संदर्भातील कामांचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, शेतकऱ्यांना सर्वाधिक आवश्यकता वीजेची असते. वीज मिळाली तर शेतकरी शेतीतून पीक मोठया प्रमाणावर उत्पादन करू शकतो. साधारण पणे ६५० ग्राहकांना या अद्ययावत विजेच्या वाहिनीचा फायदा होणार आहे. कांद्याच्या दराबाबत केंद्र सरकारने एफआरपीने कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटे असतात. आपण दोहोंवर मात करन्याचा कटाक्षाने प्रयत्न करू. कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे मात्र कोरोनाचा विषाणू अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. थोड्याच दिवसात दिवाळीचा उत्सव सुरू होत आहे; नागरिकांनी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करावी असे आवाहन देखील पालकमंत्री भुजबळ यांनी केले. यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी राज्य महामार्ग २५ ते येवला तालुक्यातील निळखेडा रस्त्याची सुधारणा करण्याच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन केले.