गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

येत्या २६ नोव्हेंबरचा देशव्यापी संप; पण का?

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 22, 2020 | 6:25 am
in इतर
0

२६ नोव्हेंबरचा देशव्यापी संप का आणि कशासाठी?

देशभरातील कामगार संघटांनी येत्या २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप का होत आहे, याविषयी प्रकाश टाकणारा हा लेख….
IMG 20201122 WA0004
संजय कोकाटे, आयुर्विमा कर्मचारी फेडरेशन, नाशिक विभाग
IMG 20201122 WA0005
शेखर मोघे आयुर्विमा कर्मचारी फेडरेशन, नाशिक विभाग
२६ नोव्हेंबर या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न , परिश्रम आणि विविध देशांतील घटना यांचा अभ्यास करून लिहीलेली राज्यघटना स्वतंत्र भारताने स्वीकारली. सर्वसामान्यांचे हक्क आणि अधिकार जपले जावेत अशी तरतूद घटनेत केली असून देखील केंद्र सरकार त्याच्याशी प्रतारणा करीत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत.
शेती आणि शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांवर नियंत्रण आणले जात आहेत.
मोदी सरकार (एक काळचे स्वदेशीचे पुरस्कर्ते) आज फक्त मोठ्या म्हणजे Corporate Industrial Houses मग ते देशी अथवा विदेशी असोत त्यांचीच भलामण करण्यात स्वत:ला पावन करून घेत आहेत.
राज्यघटनेशी प्रतारणा म्हणजे काय ?
श्रमसंहिता व्यापक चर्चेविना मंजूर करून घेणं… आणि ते देखील कोविड काळात ? श्रमसंहिता ही दीर्घकालीन लढाईनंतर कामगारांनी हासिल केलेली आणि प्रत्यक्षात आणलेली “४४ कायदे असलेली भगवद्गीता (कर्म सिध्दांतावर आधारित) फक्त ४ कायद्यात रूपांतरीत केलीय”  यात कुणाचं हित साधलं जाणार अर्थातच उद्योगपतींचंच.
लोकमतांवर निवडणूक लढविणार आणि भांडवलदारांचे बटीक होणार यात कुठेही नैतिकतेचा लवलेश दिसत नाही.
उद्योगांमध्ये संघटना स्थापन करण्यास बंदी, संपावर जाण्याचा अधिकार संपुष्टात आणणार …हे राज्यघटनेच्या तत्त्वांशी  सुसंगत वाटत नाही.
१२ राज्यांचा विरोध असताना वीजनिर्मिती, वीजपुरवठा, वीजवितरण आदींचं पूर्ण खासगीकरण हा अट्टहास कशासाठी? सार्वजनिक बॅंकांचं विलीनीकरण, रेल्वे, विमानतळ, बंदरे, कोळसा खाणी आणि विमा….यांचं खासगीकरण का आणि कशासाठी ?
शेतीवर आधारित आमचा देश असं अभिमानाने सांगितलं जातं.त्या शेतीक्षेत्राविषयी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी बाजूला ठेऊन शेतीविषयक कायद्यात बदल करणं हे सर्वस्वी शेतक-यांना नेस्तनाबूत करणार हे निश्चित. बाजार समितीत शेतमाल विकल्यानंतर पैसे मिळण्याची निश्चित हमी आहे. शेतमाल कुठेही विकता येणार पण परताव्याची हमी कोण घेणार? आणि हो सर्वात मोठा धोका म्हणजे शेतीचं Corparatisation…..खरी मेख तर इथं आहे. उद्या शेती जर औद्योगिक घराण्यांच्या ताब्यात गेली तर….शेतकरी देशोधडीला लागतील..त्यांचा स्वाभिमान धनिकांच्या चरणी गहाण ठेवला जाईल हे निश्चित…हे पंजाब, हरियाणाच्या शेतक-यांना कळतं मग इतर राज्यांतील शेतकरी आंदोलनात मागे का?
अस्तित्व टिकवायचं असेल तर संपूर्ण भारतातील शेतक-यांनी वज्रमूठ आवळून २६ नोव्हेंबर च्या संपात सहभागी होऊन सरकारच्या ध्येय धोरणांविषयी आक्रोश व्यक्त करायलाच हवा.
भारतीय आयुर्विमा महामंडळाची होऊ घातलेली शेअर मार्केटमधील नोंदणी हा LIC ची खासगीकरणाकडे वाटचाल असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. राष्ट्र उभारणीत LIC चं योगदान वाखाणण्याजोगे असताना तिच्यातील भागभांडवलाचा विनिवेश कशासाठी?… तर भांडवलदारांना प्रवेश देण्यासाठी ! आणि हळू हळू त्यांची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी.
सर्वसामान्य मतदारांनी दाखविलेला विश्वास जर लोकप्रतिनिधी धनिकांसमोर नतमस्तक होऊन लोकहिताला बाधा आणत असतील तर …  लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे… आणि म्हणून २६ नोव्हेंबर २०२० च्या संपात सहभागी होऊन मुक्त अर्थव्यवस्थेचं कालचक्र उलटं फिरवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनमाड – हिंदुस्तान पेट्रोलियमच्या भिंतीचे इंधन भरलेल्या टॅंकरने धडक दिल्याने नुकसान

Next Post

मनमाड – महाविद्यालयात ऑनलाइन पालक-शिक्षक सहविचार सभा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
online

मनमाड - महाविद्यालयात ऑनलाइन पालक-शिक्षक सहविचार सभा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011