मुंबई – येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७ जानेवारीपर्यंत विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. दरम्यान रत्नागिरीत आज अनेक ठिकाणी पाऊस पडला.
नाशिक जिल्ह्यात काल रात्री पिंपळगाव वाखरी, वडनेर भैरव यासह काही ठिकाणी मध्य रात्री पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज ढगाळ वातावरण होतं.
पुणे, अमरावती, औरंगाबाद, जालना तसंच बीड जिल्ह्यातही ढगाळ वातावरण, सिंधुदुर्ग, नवी मुंबईतही अवकाळी पावसानं हजेरी लावली.