नवी दिल्ली – अत्यंत विशाल आणि अतिभव्य अशा आकाशात ग्रह, ताऱ्यांच्या संबंधी अनेक घटना घडामोडी घडत असतात, परंतु आपल्याला त्या फारशा माहित होत नाहीत. मात्र एक दुर्मिळ घटना सुमारे चारशे वर्षांनंतर घडणार आहे. २१ डिसेंबर रोजी आकाशात गुरू आणि शनी हे सूर्यमालेतील दोन ग्रह अगदी जवळ येणार असून तेजस्वी नक्षत्राप्रमाणे असणारे हे दुर्मिळ दृश्य विलोभनीय असणार आहे.
बिर्ला तारामंडल संचालक देबी प्रसाद दुआरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इ.स. १६२३ पासून दोन्ही ग्रह इतके जवळ कधी पाहिले नव्हते. जेव्हा पृथ्वीवरुन दोन आकाशीय शरीर एकमेकांना अगदी जवळ दिसतात तेव्हा या घटनेला संयोजन असे म्हणतात. तसेच शनी आणि बुध (बृहस्पति ) यांच्या अशा संयोगास ‘ग्रेट कॉन्जेक्शन’ असे म्हणतात. त्यानंतर, गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह १५ मार्च २०८० रोजी पुन्हा इतक्या जवळ येतील. दुवारी म्हणाले की, २१ डिसेंबर रोजी दोन्ही ग्रहांमधील अंतर सुमारे ७७५ दशलक्ष किलोमीटर असेल. दररोज, हे दोघे एकमेकांच्या जवळजवळ येत राहतील . ही घटना भारतातील बहुतेक शहरांमध्ये सूर्यास्तानंतर पाहिली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
कुठे दिसेल – आकाशात
किती वाजता – सूर्यास्तानंतर (साधारण ७.३० वाजेपर्यंत)