नवी दिल्ली ः Asus ROG Phone 5 स्मार्ट फोन दहा मार्चला अधिककृतरित्या लॉन्च केला जाणार आहे. सर्वात ताकदवान प्रोसेसर असलेल्या Qualcomn च्या उच्च रेंजमधील Snapdragon 888 मोबाईल सोबत हा मोबाईल लॉन्च केला जाईल. प्रोसेसरसह इनबिल्ट स्टोरेजबाबत Asus ROG 5 हा मोबाईल खूपच विशेष असणार आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त म्हणजेच १८ जीबी रॅमसोबत या मोबाईलचं लॉन्चिंग होईल. या मोबाईलची गणना जगातला पहिला १८ जीबी रॅमचा स्मार्टफोन अशी होईल.
१० मार्चला लॉन्चिंग
Geekbech च्या यादीच्या आधारानुसार MySmartPrice नं दावा केला आहे, की Asus ROG 5 हा मोबाईल आउट ऑफ द बॉक्स काम करेल. Asus ROG 5 स्मार्टफोन यापूर्वी लॉन्च झालेल्या ROG Phone 3 चं अपग्रेडेड व्हर्जन असेल. याला जागतिक बाजारात १० मार्चला लॉन्च केलं जाईल. परंतु Asus ROG 5 स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत कंपनीनं कोणतीच माहिती दिली नाही.
Asus ROG 5 ची वैशिष्ट्ये
Asus ROG 5 स्मार्टफोन एक गेमिंग स्मार्टफोन आहे. त्याचा डिस्प्ले ६.७८ इंच असेल. तसंच हाय रिफ्रेश्ड रेट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनसाठी ६४ एमपीचा ट्रिपल कॅमेर्याचा सेटअप दिला जाईल. फोनमध्ये Snapdragon 888 SoC चा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. ६५ W चा जलद चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन पूर्वीच्या Asus ROG Phone 3 पेक्षा Asus ROG 5 स्मार्टफोनची किंमत जास्त असेल. त्याची किंमत साधारण १००० ते ११०० डॉलर इतकी असू शकते.