मुंबई – महिंद्रा अँड महिंद्रा यावर्षी भारतात आपल्या लोकप्रिय अशा SUVs चे अपडेट मॉडेल लॉन्च करणार आहे. यात महिंद्रा स्कॉर्पियो आणि महिंद्रा SUV ५०० यांचा समावेश आहे. हे दोन्ही मॉडेल्स फिचर्स आणि अपडेट्स सोबत मार्केटमध्ये उतरणार आहेत. यासोबतच महिंद्रा लवकरच भारतात आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही eKUV100 देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.
ही भारतातीn सर्वांत स्वस्त एसयूव्ही असेल. सिंगल चार्जमध्ये जवळपास १४७ किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या गाडीत असेल. या गाडीत केबीन प्री-कुलींग, फुल्ल टच स्क्रीन इन्फोमेंट सिस्टीम, कनेक्टेड कार फिचर्स, रिमोट डायग्नॉस्टिक्स, लोकेशन ट्रॅकींगसारखे फिचर्स आहेत. याशिवाय स्टिअरिंग माऊंटेड आडियो कंट्रोल फिचरही देण्यात आले आहे.
यात मॅन्युअल एअर कंडीशनिंग आणि रिमोट तसेच सेंट्रल लॉकसारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. इलेक्ट्रीक मोबिलीटीसाठी कंपननीने आपल्या एसयूव्ही KUV100 ला निवडले आहे. इलेक्ट्रीक कार कमीत कमी किंमतीत ग्राहकांना मिळावी आणि उत्पादनही दर्जेदार राहावे, असा त्यामागचा उद्देश आहे. या इलेक्ट्रीक एसयूव्हीला गेल्यावर्षी झालेल्या आटो एक्स्पोमध्ये लॉन्च करण्यात आले होते. यात १५.९ किलोवॅटची लिक्विड कुल मोटर देण्यात आली आहे. ८० टक्के चार्जींगसाठी अवघे ५० मिनीट लागतात, असा कंपनीचा दावा आहे.