मुंबई – क्लासिक रेट्रो बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने भारतात 2021 हिमालयनला अनेक नव्या फिचर्ससह लॉन्च केलेले आहे. त्याचवेळी मार्केटमध्ये कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी जावा मोटरसायकलनेही जावा 42 चा पहिला अधिकृत टीझरही लॉन्च केला आहे. ही गाडी देखील लवकरच भारतात लॉन्च होईल.
कंपनीने हे टीझर 2021My42 या नावाने जारी केले आहे. चेकोस्लोवाकीच्या या कंपनीने बऱ्याच अंतराने भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला होता आणि वर्ष 2019 च्याशेवटी कंपनीने जावा, जावा 42 व जावा पेराकला लॉन्च केले होते. भारतात या सर्व गाड्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. जावा क्लासिक आणि 42 थेट रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि Meteor 350 ला टक्कर देणारी आहे. 10 सेकंदांच्या या टीझर व्हीडीयोमध्ये 42 नावापेक्षा जास्त काही सांगण्यात आलेले नाही. यात फक्त“The Seduction Begins” and “Coming Soon” एवढेच लिहीलेले आहे.सध्या 2021 जावा 42 मध्ये मोठ्या बदलांची अपेक्षा केली गेलेली नाही. यात फक्त नव्या जनरेशनसाठी एक ताजे अपडेट देण्यात आले आहे, एवढेच.
अलीकडेच या गाडीचे वायर्ड स्पोकएेवजी ट्यूबलेस टायर्स आणि अलॉय व्हील्ससोबत टेस्टींग करण्यात आले. ज्यात केवळ ट्यूब टायर्सचा वापर करण्यात आला होता. असेही बोलले जात आहे की ट्यूबलेस टायर्समुळे ही गाडी पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. जावा 42 ची एक्स शोरुम किंमत 1.63 लाख रुपयांपासून 1.72लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!