बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल – शिक्षण मंत्री उदय सामंत

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 5, 2020 | 2:52 pm
in राज्य
0
robot

मुंबई –  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. या उद्घाटन सोहळ्यास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के, प्रा.महेंद्र शिरसाठ, अमित किमटकर, सुबोध भालेराव व संबंधित उपस्थित होते. सामंत म्हणाले, रुग्णालये, हॉटेल्स, व्यावसायिक जागा आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल. तंत्रज्ञान विकसन प्रक्रियेत आधुनिक महाराष्ट्र कोठेच कमी नाही. विशेषतः विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसित झाले याचा आनंद आहे. राज्यातील रोबोटिक्स क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असून भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

 

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढत असताना अजूनही लसीचे संशोधन झाले नसल्यामुळे या रोबोटची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडचा सामना करण्यासाठी सॅनिटायझिंग टनेल, युव्ही -सी टॉर्च आदी संशोधने होत असताना हे रोबोटचे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या संशोधनाच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असून या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. जोपर्यंत एखादी चांगली संकल्पना वास्तविक रुपाने लोकांच्या उपयोगात येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना तिचे महत्त्व नसते. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना उचलून धरत त्यांच्या जोपासनेसाठी पाठबळ उभे करायला हवे, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

 

युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे तंत्रज्ञान हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या एकत्रीकरणातून या संशोधनाची निर्मिती झालेली आहे. संशोधनासाठी अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या प्रयत्नातून ‘युव्ही – ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट'(तारा)ची निर्मिती झाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कोरोना विषाणू व तत्सम सुक्ष्मजीवांचे निर्जंतुकीकरण करणे साध्य होणार आहे.

या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी  अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची  खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची  क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही  नायनाट करणे शक्य होणार आहे.

रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ॲपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याहीपलीकडे जाऊन हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.

रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची  सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड-१९ वॉर्ड, मोठमोठे माॅल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किराणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी  हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे,  विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.

विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा.डॉ.आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे, रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके आणि त्यांच्या संघाने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ३७४ कोरोनामुक्त. २४० नवे बाधित. ६ मृत्यू

Next Post

राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयने १८३ कोटींच्या बनावट बँक हमी घोटाळ्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला केली अटक

सप्टेंबर 10, 2025
T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Next Post
carona

राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011