युवक बिरादरीचा अनोखा उपक्रम
– सुचित्रा गायकवाड, दिल्ली एनसीआर विभाग प्रमुख
लोकशाही मूल्यांचे संस्कार, संसदीय पध्दतीचा आचार, सकारात्मकता, कार्य कुशलता इत्यादी गुणांचे संस्कार युवा पिढी वर व्हावे यासाठी युवक बिरादरीने एका उपक्रमाची आखणी केली आहे. 16 ते 25 वयोगटासाठी युवा संसद आणि युवाभूषण या स्पर्धोचे आयोजन केले आहे.
5 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान विविध टप्प्यांमध्ये ही स्पर्था होणार आहे. त्यासाठी स्पर्धकांना 3 डिसेंबर पर्यंत स्पर्थकांना www.biradari.org या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करता येईल.
युवा भूषण स्पर्थेत पहिल्या टप्यात 5 डिसेंबरला देशभरातील 180 केंद्रावर स्पर्थकांचीआॅनलाईन मूल्यमापन चाचणी घेतली जाईल. यातील यशस्वी विद्यार्थ्यांची 12 व 13 डिसेंबरला होणाऱ्या आॅनलाइन व्यक्तीगत गुणांची परीचय फेरी घेतली जाईल.
यातील यशस्वी स्पर्थकांना गौरव प्रमाणपत्रे तसेच नियोजित अभिरुप युवा संसद उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.याशिवाय गुणवता धारकांना गुणविकासासाठी जानेवारी ते मे महिन्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आॅनलाइन निःशुल्क मार्गदर्शन केले जाईल.
तिसऱ्या टप्प्यात 20 ते 23 डिसेंबर दरम्यान अभिरुप युवा संसद उपक्रमाची नोंदणी तसेच पूर्व तयारी, संहिता आणि सादरीकरणाबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल.चौथ्या टप्प्यात 3 ते 7 जानेवारी दरम्यान नियोजित केंद्रांमध्ये अभिरुप युवा संसद विभागीय स्पर्धा होईल.पाचव्या टप्प्यात विभागीय स्पर्धेतून सर्वेश्रेष्ठ ठरणाऱ्य समूहांना 11 व 12 जानेवारी रोजी मुंबईत अंतिम स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाईल. युवा भूषण व युवा संसद या दोन्ही स्पर्धेतील स्पर्थकांना व समुहांना अनुक्रमे 50,30,20 हजार रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी 9873247620 किंवा info@biradari.org. किंवा teamyb1947@gmail.com या मेल वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे