जिनिव्हा – संपूर्ण जगात कोरोनाच्या साथीचा दहा महिन्यांनंतरही प्रादुर्भाव कायम आहे. किंबहुना युरोप, अमेरिकेसह अनेक देशात त्याचा प्रकोप वाढत आहे. युरोपात पुढील वर्षी कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबरो यांनी व्यक्त केली आहे.
नाबरो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सध्या कोरोनाची दुसरी लाट युरोपमधील काही देशांमध्येही दिसून येत आहे. याचवेळी अमेरिकेसह देशांमध्ये देखील त्याचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये आंशिक लॉकडाउनही लागू करण्यात आले आहे. तसेच युरोपमधील परिस्थिती अशी आहे की, कोरोनाची तिसरी लाट येथे येण्याची शक्यता जास्त आहे. सध्या संपूर्ण जगाचे डोळे कोरोनावरील प्रभावी लसीकडे लागले आहे. परंतु यापूर्वीच युरोपमधील परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते. नाबरो यांच्या मते, कोविड -१९ ची पहिली लाट या उन्हाळ्यात युरोपमध्ये दिसून आली, तर आता दुसरी लाट सुरू आहे.
दरम्यान, युरोपातील काही देश या संकटाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात अपयशी ठरले आहेत. अशा परिस्थितीत कोविड -१९ ला सामोरे जाण्यासाठी आशियात केल्या जाणार्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुकही केले आहे. ते म्हणले की, युरोपीयन देशांनी आशियाई देशांप्रमाणे त्वरित व ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. मात्र जर तसे झाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.
विशेष महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्याच्या सुरूवातीस कोविड -१९ चे रुग्ण युरोपमध्ये झपाट्याने वाढू लागली आहेत. योग्य प्रतिबंध उपाय न केल्यास त्याच रुग्ण वाढू शकतात. तसेच आशियाई देशांमधील प्रतिबंधात्मक उपायांची प्रशंसा करताना ते म्हणाले की, आशियाई लोक त्यासंबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यामुळे प्रकरणांमध्ये घट झाली आहे. तसेच प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनबद्दल त्यांनी आशियाई देशांचे कौतुक केले.