नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे सिव्हील सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षा अर्थात (प्रिलियम) २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अवघ्या १९ दिवसात निकाल जाहीर झाला आहे. २३ ऑक्टोबरपासून upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सीएस पूर्व परीक्षा २०२० सोबतच भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा नियमानुसार जे विद्यार्थी पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आता यूपीएससी सिव्हिल सेवा मुख्य परीक्षेचा अर्ज भरावयाचा आहे. २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाणार आहे. तीन, चार आठवडे आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.