नाशिक – ‘युनिसेफ वर्ल्ड’चा ‘युव्हा युथ चॅलेंज’ अवॉर्ड नाशिकच्या ‘इस्पॅलियर स्कूल’ला जाहीर करण्यात आला आहे. स्कूलने सुरु केलेल्या रेडिओ प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने नाशिकच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
इस्पॅलियर स्कूलचे संस्थापक सचिन जोशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, युनिसेफ वर्ल्डने कोरोना महामारी मध्ये विविध समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी आरोग्य, शिक्षण, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात जनरेशन अनलिमिटेड या नावाने स्पर्धात्मक उपक्रम राबविला. यामध्ये ३९ देशातील १५ लाखाहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी सहभाग घेतला. त्यातून एक लाखावरून अधिक इन्क्युबॅशन स्टार्ट आयडिया आल्या. मग त्या त्या देशातील युनिसेफने त्यातील उत्तम आयडियाला वर्ड युनिसेफ न्यूयॉर्कला पाठवल्या. भारतातील युनिसेफ इंडिया आणि DFC India यांनी भारत सरकार निती आयोग यांच्या मार्फत इस्पॅलियर स्कूलचा रेडिओ इस्पॅलियर प्रोजेक्टची नियुक्ती केली. हेन्रिएटा होलसमॅन फॉर हे अमेरिकन सरकारचे अधिकारी आहेत जे युनिसेफचे कार्यकारी संचालक असून त्यांनी ३९ देशातील आठ उत्तम प्रोजेक्टची निवड करून त्यांना सन्मानित केले. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील जगातील उत्तम प्रोजेक्ट भारताला जाहीर झाला. नाशिकमधील इस्पॅलियर स्कूलचा ऑनलाइन रेडिओ इस्पॅलियर या प्रोजेक्टची निवड होऊन आता युनिसेफ तर्फे याला सीड फंडिंग उपलब्ध होईल. ऑनलाईन शिक्षणासाठी इस्पॅलियर स्कूल तर्फे रेडिओची निर्मिती झाली, बालवाडी, पहिली ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे अडीच हजार भाग ऑनलाइन रेडिओवर उपलब्ध केले. शहरातील विद्यार्थ्यांसोबत हा रेडिओ विविध सरकारी शाळा आणि पालकांना उपलब्ध करून दिला. यात जिल्हा परिषद शाळा, आदिवासी विद्यार्थी यांना याचा फायदा झाला.
भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील शालेय विद्यार्थी आणि शिक्षक अभ्यासक सचिन जोशी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर युनिसेफने निवड केली. हा प्रोजेक्ट शिक्षण तज्ज्ञ किरण सेठी, डी.एफ.सी हेड नंदिनी सूड, युनिसेफ इंडियाच्या अनन्या पांडे यांनी सहकार्य केले.
शुक्रवारी (११ डिसेंबर) न्यूयॉर्क वरून या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग झाले, त्यातील महत्त्वाचे प्रसंग दर्शविणारा हा व्हिडिओ