मुंबई – कोणत्याही प्रकारची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून घ्यायची असेल तर त्याला युट्यूबशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. पण अनेकदा इंटरनेटचा स्पीड चांगला असूनही व्हिडीओ झटकन लोड होत नाही. आणि मग तो व्हिडिओ लोड होण्याची वाट बघण्याचा कंटाळा येऊन आपण ते बंद करून टाकतो. तुमचंही असं काही होतं का? यावर उपाय म्हणून आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
Cache डेटा क्लिअर करणे गरजेचे
युट्युब व्हिडीओ बफरिंगपासून वाचायचे असेल तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यात cache डेटा सोबतच व्हिडिओची क्वालिटी पाहण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
तुमचे इंटरनेट कनेक्शन, स्पीड उत्तम असेल, अन्य साईट्स व्यवस्थित चालत असतील आणि केवळ युट्यूबला अडचणी येत असतील तर cache मुळे असे होऊ शकते. Cache क्लिअर करण्यासाठी फोन, डेस्कटॉप, लॅपटॉप कुठेही गुगल क्रोम सुरू करा. तिथे वरती उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक केलं की, हिस्ट्रीचा पर्याय मिळेल. त्यात जाऊन क्लिअर ब्राउजिंग डेटा वर क्लिक करा. किती कालावधीतील डेटा काढून टाकायचा हे तुम्ही ठरवू शकता. यासोबतच कुकीज, साईट डेटा, फाईल्स हे देखील सिलेक्ट करा आणि हे सगळं डिलीट करा.
तर हे बदला
Cache डेटा क्लिअर केल्यानंतरही युट्युब व्यवस्थित सुरू होत नसेल तर तुम्हाला व्हिडीओ क्वालिटी बदलण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला गिअर आयकॉनवर क्लिक करायला हवे. हा पर्याय तुमच्या स्क्रीनच्या उजव्या हाताला खाली किंवा मग वरती दिसेल. यात जाऊन तुम्ही लोअर रिझोल्युशन करून तुम्ही व्हिडीओ पाहू शकता. स्मार्टफोन, डेस्कटॉप तसेच लॅपटॉपवर तुम्हाला हा पर्याय मिळू शकतो.