नवी दिल्ली – युट्युबतर्फे या वर्षी मार्च महिन्यात ग्राहकांसाठी व्हिडीओ क्वालिटी HD 480p मध्ये बदलण्यात आले. कोरोनाकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वजण घरी असल्याने बहुतांश वेळ युट्युबवर घालवत असत. यामुळे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात लोड येत होता. त्यामुळे एचडी सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता भारतातील युट्युब ग्राहकांसाठी मोबाईलवर एचडी सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मार्चपासून जूनपर्यंत युट्युब ग्राहकांसाठी व्हिडीओ क्वालिटी 480p पर्यंत कमी करण्यात आली होती. मात्र जुलै पासून यात बदल करण्यात आले असून आता 1080p पर्यंत एचडी सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच भारतातील ग्राहकांसाठी मोबाईलवर ही एचडी क्वालिटी पुन्हा एकादा सुरू झाली आहे. त्यामुळे आता पूर्वी सारखे सर्वांना एचडी क्वालिटीचा लाभ घेता येणार आहे. यासंबंधी युट्युबने अधिकृत घोषणा केली असून 720p ते 1080p पर्यंत एचडी व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र, सध्या 4k क्वालिटीसाठी ही सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. परंतु या बाबत युट्युबतर्फे लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.