नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट जुलै २०२०चा निकाल अखेर जाहिर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची प्रतिक्षा होती. देशभरातील ५ लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. हा निकाल वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. गेल्या २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर या काळात ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. याद्वारे विद्यापीठातील पीएचडी प्रवेशासाठी मदत होते तसेच विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असते.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे