नवी दिल्ली – केंद्र सरकारने एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या तरतूदीचा समावेश करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये अवैध कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जात होते. या सुधारित तरतुदीनुसार केंद्र सरकारने सप्टेंबर, 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले.
राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या आणि दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याच्या धोरणाप्रति वचनबद्धता अधिक मजबूत करत मोदी सरकारने आज पुढील अठरा व्यक्तींना युएपीए कायदा 1967 च्या (2019 मध्ये सुधारित) तरतुदीनुसार दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यांची नावे या कायद्या सूचीत समाविष्ट केली . त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहेः
1. | साजिद मीर @ साजिद मजीद @ इब्राहिम शाह @ वसी @ खली @ मुहम्मद वसीम | पाकिस्तान स्थित वरिष्ठ एलईटी कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्यांपैकी एक होता. |
2. | युसुफ मुझम्मिल @ अहमद भाई @ युसूफ मुझम्मिल बट @ हुरेरा भाई | जम्मू-काश्मीरमधील एलईटी कारवायांचा पाकिस्तान स्थित कमांडर आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी. |
3. | अब्दुर रहमान मक्की @ अब्दुल रहमान मक्की
|
हाफिज सईद याचा मेव्हणा , एलईटीचा प्रमुख आणि एलईटी राजकीय प्रकरणांचा प्रमुख आणि एलईटीचा परराष्ट्र संबंध विभाग प्रमुख .होता |
4. | शाहिद मेहमूद @ शाहिद मेहमूद रेहमतुल्ला | पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या फलाह-ए-लन्झनियात फाउंडेशन (एफआयएफ). या अग्रणी संघटनेचा उपप्रमुख
|
5. | फरहतुल्लाह घोरी @ अबू सुफियान @ सरदार साहब @ फारू | पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि अक्षरधाम मंदिर (2002) हल्ला आणि हैदराबादमधील टास्क फोर्स कार्यालयावर आत्मघाती हल्ला (2005).यात सहभाग |
6. | अब्दुल रौफ असगर @ मुफ्ती @ मुफ्ती असगर @ साद बाबा @ मौलाना मुफ्ती रौफ असगर | नवी दिल्लीतील भारतीय संसद भवनवरील दहशतवादी हल्ल्याचे (13.12.2001) षडयंत्र रचण्यात आणि लष्करी प्रशिक्षण आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण शिबिरांची उभारणी करण्यात सहभागी पाकिस्तान स्थित दहशतवादी. |
7. | इब्राहिम अथार @ अहमद अलीमोहद. अली शेख @ जावेदअमजाद सिद्दीकी @ ए.ए. शेख @ चीफ | 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात कंदहार अपहरण प्रकरण) सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार (13.12.2001). |
8. | युसूफ अझहर @ अझर यूसुफ @ मोहम्मद. सलीम | 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सचे उड्डाण क्रमांक एलसी -814 च्या अपहरणात (कंदहार अपहरण प्रकरण) सामील असलेला पाकिस्तान स्थित दहशतवादी |
9. | शाहिद लतीफ @ छोटा शाहिद भाई @ नूर अल दिन | पाकिस्तानमधील दहशतवादी आणि सियालकोट क्षेत्राचा जैश-ए -मोहम्मदाचा कमांडर , जेईएम दहशतवाद्यांना भारतात आणण्यात सहभाग . भारतातील दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, सेवा पुरवणे, आणि अंमलबजावणीमध्ये देखील सहभागी होता |
10. | सय्यद मोहम्मद युसुफ शहा @ सय्यद
सलाहुदीन @ पीर साहब @ बुजर्ग |
पाकिस्तान आधारित, हिज्ब-उल-मुजाहिद्दीनचा सर्वोच्च कमांडर आणि युनायटेड जिहाद काउन्सिलचा अध्यक्ष (यूजेसी) एचएम कॅडरद्वारे दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी भारतात निधी उभारणी आणि वित्तपुरवठा करण्यात सहभागी |
11. | गुलाम नबी खान @ अमीर खान @ सैफुल्ला खालिद @ खालिद सैफुल्ला @ जवाद @ दांड | पाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीनचा उप-प्रमुख (एचएम). |
12. | झाफर हुसेन भट @ खुर्शीद @ मोहम्मद. जफर खान @ मौलवी @ खुर्शीद इब्राहिम | पाकिस्तान स्थित हिजबुल मुजाहिद्दीन चा उपप्रमुख, आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे आर्थिक व्यवहारही सांभाळतो . काश्मीर खोऱ्यात एचएम कारवायांसाठी निधी पाठविण्यास जबाबदार. |
13. | रियाझ इस्माईल शाहबंदरी @ शाह रियाझ अहमद @ रियाज भटकळ @ मोह . रियाझ @ अहमद भाई @ रसूल खान @ रोशन खान @ अझीझ | पाकिस्तान स्थित , “इंडियन मुजाहिद्दीन” या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य. जर्मन बेकरी (2010), चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू (2010), जामा मशिद (2010), शीतलाघाट (2010) आणि मुंबई (2011) सह भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. |
14. | मोह . इकबाल @ शबंद्री मोहम्मद इक्बाल @ इकबाल भटकळ | पाकिस्तान स्थित , इंडियन मुजाहिद्दीन (आयएम). दहशतवादी संघटनेचा सह-संस्थापक, जयपुर बॉम्बस्फोट मालिका (2008), दिल्ली बॉम्बस्फोट मालिका (2008), अहमदाबाद आणि सुरत बॉम्बस्फोट (2008) जर्मन बेकरी ब्लास्ट, पुणे (2010) आणि चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलुरू स्फोट (2010) यासह दहशतवादी वित्तपुरवठा आणि विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. ) |
15. | शेख शकील @ छोटा शकील | दाऊद इब्राहिमचे पाकिस्तान स्थित सहकारी, डी-कंपनीच्या सर्व गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड कारवाया पाहतो. डी-कंपनीच्या भारतातील कारवायांना वित्तपुरवठा , 1993 मध्ये गुजरात मध्ये शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सामील होता. |
16. | मोहम्मद अनीस शेख | मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण 1993 मध्ये सहभाग आणि शस्त्रे, दारुगोळा आणि हॅण्डग्रेनेडच्या पुरवठ्यास जबाबदार पाकिस्तानस्थित दहशतवादी. |
17. | इब्राहिम मेमन @ टायगर मेमन @ मुश्ताक @ सिकंदर @ इब्राहिम अब्दुल रझाक मेमन @ मुस्तफा @ इस्माईल | मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात गुन्हेगारी कट रचणारा पाकिस्तान स्थित दहशतवादी. |
18. | जावेद चिकना @ जावेद दाऊद टेलर | 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सामील असलेला पाकिस्तान स्थित दाऊद इब्राहिम कासकरचा हस्तक. |
सीमेपलिकडून विविध दहशतवादी कारवायांमध्ये हे सामील होते. आणि देशाला अस्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न अथक सुरु होते.