मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० खाटांच्या वर असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात द्रवरुप ऑक्सिजनचा प्लान्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला, सरकारनं आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना इथं ही माहिती दिली. जालना इथल्या कोविड रुग्णालयातल्या, नवीन ४० अद्ययावत आय.सी.यु बेडचं उदघाटन, टोपे यांनी आज केलं. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनची गरज वाढली आहे. त्यामुळे जुन्या ऑक्सिजन सिलेंडरवर आता निर्भर राहून चालणार नाही. त्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयानं ऑक्सिजनचे प्लान्ट टाकणं आम्ही बंधनकारक केलं असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा घेता यावा म्हणून, पुढच्या आठवड्यात सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमं, महत्त्वाची सर्व वर्तमानपत्र, होर्डिंग्ज याद्वारे या योजनेची, सरकार जाहिरात करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून कोविड, नॉन कोवीड असे जे पॅकेजेस असतील यात कुणाचीही फसवणूक होता कामा नये, यासाठी या जाहिरातीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची १०० टक्के माहिती असेल,असं टोपे म्हणाले.