नवी दिल्ली – इतर मोबाईल कंपन्यांप्रमाणेच रेड मी नोट सिरीज ग्राहकांची आवडती आहे. हे आम्ही नाही तर याचे विक्रीचे आकडे सांगतायत. या सिरीजचे आतापर्यंत तब्बल २० कोटी फोन जगभरात विकले गेले आहेत.
रेड मी हा शाओ मी या चिनी कंपनीचा सब ब्रँड आहे. २०१४ मध्ये सर्वप्रथम ही सिरीज बाजारात आली. त्यावेळेस रेड मी नोट, रेड मी नोट ४जी आणि रेडमी न प्राईम हे तीन फोन लाँच करण्यात आले होते.
त्यानंतर दरवर्षी पुढच्या सिरीजचे फोन येत राहिले आणि ग्राहकांच्या पसंतीसही उतरले. सध्या रेडमी नोट ९ प्रो हा लेटेस्ट फोन आहे. याचे ४जीबी आणि ६४जीबी मॉडेल केवळ १२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहेत. तर १२८जीबी स्टोअरेजचा ओहोन १३ हजार ९९९ रुपयांना मिळतो आहे. हे सर्व फोन ग्राकांच्या पसंतीस उतरले आहेत. म्हणूनच या फोन्सच्या विक्रीने तब्बल २० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तशी अधिकृत माहिती कंपनीच्यावतीनेच देण्यात आली आहे.