नवी दिल्ली – दिवसभर स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप मॅसेज बघण्याची प्रत्येकालाच सवय असते, परंतु आता लवकरच काही स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप मॅसेज काम करणे थांबवणार आहे, अशा परिस्थितीत काही स्मार्टफोन वापरकर्त्यांना सहन करावी लागू शकतो.
एका अहवालानुसार व्हॉट्सअॅप लवकरच आयओएस 9 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या अॅपल आयफोनवरील अॅप बंद करणार असल्याचे व्हॉट्सअॅपने कळविले आहे. डब्ल्यूएबीटाइन्फोने देखील आयफोनसाठीची सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. आयओएस 9 वर चालणार्या आयफोनला व्हॉट्सअॅपच्या 2.2150 बीटा व्हर्जनचा काही काळ सपोर्ट मिळणार नाही.
आयओएस 10 ऑपरेटिंग सिस्टम किंवा उच्च ऑपरेटिंग सिस्टम आधारित स्मार्टफोन असणारे मोबाईल वापरकर्ते लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा उपयोग करणे थांबवतील. सोप्या भाषेत सांगायचे तर आयफोन 4 आणि आयफोन 4 एस स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपची सुविधा मिळू शकणार नाहीत. मात्र अद्याप व्हॉट्सअॅपवरुन अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.