नवी दिल्ली – रेल्वेने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ला खालील सात नवीन हाय स्पीड रेल्वे (एचएसआर) कॉरिडोरसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिले आहे:
(i) दिल्ली-नोएडा-आग्रा-कानपूर-लखनऊ-वाराणसी
(ii) दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद
(iii) मुंबई-नाशिक-नागपूर
(iv) मुंबई-पुणे-हैद्राबाद
(v) चेन्नई-बंगळूरू-मैसूर
(vi) दिल्ली-चंडीगड-लुधियाना-जालंधर-अमृतसर
(vii) वाराणसी-पटना-हावडा
वरील सात हाय स्पीड कॉरिडॉरपैकी एकाही कॉरिडॉरला अद्यापपर्यंत मंजूरी दिलेली नाही. कोणताही एचएसआर प्रकल्प मंजूर करण्याचा निर्णय हा तपशीलवार प्रकल्प अहवालाचे परिणाम, तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता, स्रोतांची उपलब्धता आणि वित्तपुरवठा पर्याय यावर अवलंबून असतो. तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे आणि कॉरिडॉरसाठीचे मार्ग अद्याप निश्चित झालेले नाही.रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.