नवी दिल्ली – भारतासारख्या देशात व्हॉट्सअॅपचा वापर पूर्णपणे विनामूल्य आहे. मात्र, लवकरच व्हॉट्सअॅपच्या काही निवडक वापरकर्त्यांकडून अॅप वापरण्यासाठीचे शुल्क आकारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपचे बिझनेस अकाउंटमध्ये लवकरच हे बदल होणार आहेत. ही पूर्णपणे व्यावसायिक सेवा असेल. या व्यावसायिक सेवा व्हॉट्सअॅप व्यवसायासाठी कंपनीच्या वतीने शुल्क वसूल करण्याचे काम करणार आहे.
उर्वरित ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप पूर्वीप्रमाणेच विनामूल्य असेल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपतर्फे अद्याप किती रक्कम आकारली जाई याबाबत कोणतीही अधीकृत माहिती देण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे व्हॉट्सअॅपचे बिझनेस अॅप वापरकर्त्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य असेल.
—
लघु उद्योगांना मिळणार लाभ
या अँप्लिकेशनच्या माध्यमातून लहान व्यावसायिकांना मदत होणार आहे. ग्राहकांपर्यंत थेट वस्तू पोहोचण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ही सुविधा लघु उद्योगांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यावसायिकांची झालेली कोंडी या माध्यमातून दूर होणार आहे. सध्या जगभरात ५ कोटी पेक्षा जास्त जण हे अँप्लिकेशन वापरत आहेत.