या वर्षात शनीचा कुंभ राशीवर कसा राहणार प्रभाव?
२२ जानेवारी रोजी शनी हा श्रवण नक्षत्रामध्ये प्रवेश करीत आहे. याचा कमी-अधिक शुभाशुभ परिणाम बाकी राशींप्रमाणे कुंभ राशीवरही होणार आहे. कुंभ राशीच्या द्वादश भावामध्ये या काळात शनि विराजमान असणार आहे. त्यातच सध्या मकर राशीला सुरू असलेल्या साडेसातीपैकी कुंभ राशीला पहिली अडीचकीची सुरुवात आहे. त्यामुळे कुंभ राशी असलेल्यांनी स्वतःच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कुंभ राशीचा स्वामी देखील शनी आहे. खर्चामध्ये अनपेक्षित वाढ होणार आहे. पायाचे तसेच टाचेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. विविध बाबतीत यापूर्वी आलेल्या वाईट अनुभवांमुळे यापुढील काळात विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. नोकरदारांनी वरिष्ठांची खप्पा मर्जी सांभाळावी. पहिली अडीच की असली तरी शनी ११ मे ते २९ सप्टेंबर असा पाच महिने वक्री असणार आहे. ज्येष्ठांनी देखील जुनी दुखणे संभाळावे. महत्त्वाच्या व्यक्तींना आपल्याबाबत गैरसमज होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक संबंधांमध्ये कडवटपणा येऊ नये याबाबत देखील काळजी घ्यावी.
असे असतील शुभ परिणाम
कुंभ राशीच्या द्वादश ठिकाणी असणाऱ्या शनीचे शुभ परिणामही आहेत. शिक्षण अथवा नोकरीसाठी किंवा नोकरीतील बढतीसाठी अचानक मिळणारा परदेशगमन योग, देशांतर्गत दूरचे प्रवास, विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश लाभणार आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ती संधी द्वादश ठिकाणच्या शनी व गुरु यामुळे मिळणार आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने नवीन व्यवसायाला सुरुवात केल्यास त्यात यशप्राप्तीचा मार्ग मिळू शकतो…….
याच लेखमालेत आपण उद्या पुढची रास बघू..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.