पुडुचेरी : पुडुचेरीमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ४ आमदारांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसचे आणखी एक आमदार ए. के. जॉन कुमार यांनी राजीनामा दिला असून अलिकडच्या काळात राजीनामा देणारे ते कॉंग्रेसचे चौथे आमदार आहेत. त्यामुळे केंद्र शासित प्रदेशात व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वात असलेले कॉंग्रेस सरकार अडचणीत सापडले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकण्यासाठी येत असताना एक दिवस आधीच कुमार यांनी राजीनामा दिला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत कॉंग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे.
यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी कॉंग्रेसचे आमदार मल्लादी कृष्णा राव आणि माजी पीडब्ल्यूडी मंत्री ए. नमसिवमाये आणि ई. थेप्पंजन यांनी २५ जानेवारी रोजी राजीनामा दिला. तर गेल्या वर्षी जुलैमध्ये कॉंग्रेसच्या दुसर्या सदस्याला पक्षविरोधी कामांसाठी अपात्र ठरविण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचा निकटवर्ती समजला जाणारा आमदार ए. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एक दिवस नंतर येथे पक्षासाठी प्रचार सुरू करणार आहेत. अशा वेळी जॉन कुमार यांनी राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे ३०-सदस्यांच्या पुडुचेरी असेंब्लीमध्ये कॉंग्रेस-द्रमुक सरकारला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. राजीनाम्यांमुळे कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या १० झाली आहे, तर विरोधी पक्षाकडे १४ आमदार आहेत.
आमदार ए जॉन कुमार यांनी कॉंग्रेस सरकारमधील असंतोष असल्याचे सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, तामिळनाडू आणि पुडुचेरी येथे एकाच वेळी निवडणुका घेण्यात येणार आहेत. मात्र निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. दोन आठवड्यांत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री नारायणसामी यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
……..