नवी दिल्ली – कोरोना लसीच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर आता देशातील अनेक राज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात आणि ओडिशासह अनेक राज्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासाठी संबंधित राज्य सरकारनी कोरोनापासून काळजी घेण्यासाठी ज्या काही सूचना, नियमावली जारी केली आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
गुजरातमध्ये ७ जानेवारीपासून १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत. बुधवारी झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तर ओडिशा सरकारने देखील ८ जानेवारीपासून १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये ९ वी ते १२ वी, आणि महाविद्यालये १८ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. तर पंजाबमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा ७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. पालकांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे शिक्षण मंत्री विजय सिंगला यांनी सांगितले.