मुंबई ः कमीत कमी दरांचे विविध प्लॅन आणून जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या मोबाईल कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू झाली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तिन्ही कंपन्या परवडेल असे नवे प्लॅन सादर करतात. २०० किंवा त्याहून कमी रुपयांच्या रिचार्जमध्ये सर्वाधिक डाटा देण्यासाठी कंपन्यांची तगडी स्पर्धा सुरू आहे.
जिओ प्रथम स्थानी
कमी पैशात अधिक डाटा देणा-या कंपन्यांच्या यादीत रिलायन्ल जिओ कंपनीचा पहिला क्रमांक आहे.
जिओनं १४९ रुपयांच्या रिचार्जवर अलिमिटेड व्हॉइस कॉलिंग प्लॅन दिला आहे. ज्यात २४ दिवसांसाठी २४ जीबी डाटा दिला जात आहे. तसंच सोबत १ जीबी अतिरिक्त डाटाही दिला जात आहे. यासोबतच दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सब्सक्रिपशनही दिलं जात आहे. जिओच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डाटा दिला जात आहे. हा प्लॅन २८ दिवसांचा आहे. यामध्ये ४२ जीबी डाटा दिला जात आहे. सोबतच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस, जिओ अॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शनही दिलं जात आहे.
एअरटेल दुस-या स्थानी
एअरटेल कंपनीनं २०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे तीन प्लॅन सुरू केले आहेत. पैकी १४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये २ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. हा प्लॅन २८ दिवसांचा आहे. हॅलो ट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.एअरटेलनं १७९ रुपयांचा आणखी एक प्लॅन आणला आहे. त्यामध्ये २ जीबी डाटा, २०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. सोबतच हॅलो ट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉल्स, १०० एसएमएस आणि २४ दिवसांची वैधता आहे. हॅलो ट्यून्स, एअरटेल एक्स्ट्रीमचं सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक आणि प्राइम व्हिडिओचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.
VI चे स्वस्त प्लॅन
VI कंपनीनंही स्वस्त प्लॅन बाजारात आणले असून, १४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १ जीबी डाटा, १०० एसएमएस आणि १८ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. १४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांचा असून, ३ जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग ३०० एसएमएसचा समावेश आहे. सोबतच VI सिनेमा, टीव्ही, बेसिकची सुविधा देण्यात आली आहे. १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४ दिवसांत दररोज १ जीबी डाटा, १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, VI मुव्हीची सुविधा देण्यात येत आहे.