मुंबई – गुगलच्या प्ले स्टोर वर उपलब्ध असलेले काही लोकप्रिय असे डेटिंग, ट्रॅव्हलिंग, व्हिडीओ कॉलिंग चे अॅप्स हे युजर सेक्युरिटीच्या बाबतीत खतरनाक असल्याचे निदर्शनास आले आहे. या अॅप्सना बग CVE-2020-8913 या नावाने ओळखले जाते. हा बग तुमच्या मोबाईल मध्ये खतरनाक कोड इंजेक्ट करतो आणि त्यानंतर तुमचा पर्सनल डेटा चोरी जाणे, तुमच्यावर पाळत ठेवणे, हॅकिंग, अश्या घटना व्ह्यायला लागतात. नुकतेच या बाबतीत एक महत्त्वपूर्ण खुलासा Check Point च्या रिसर्चर कडून केला गेलाय.
Check Point चे असे म्हणणे आहे की अॅन्ड्रॉइड युजर्सची सुरक्षा या अॅप्सच्या वापरामुळे धोक्यात येऊ शकते. गुगल तर्फे एप्रिल महिन्यात हा बग शोधला गेलाय. युजर सुरक्षेला पोचवू शकणाऱ्या नुकसानीच्या क्षमतेनुसार या बग ला १० पैकी ८.८ रेटिंग देण्यात आली आहे. अॅप्स डेव्हलप करणारे अनेक डेव्हलपर्स हे आजही Google Core Library (GPC) चे आउटडेटेड व्हर्जन वापरतात.
Check Point च्या मते या जुन्या व्हर्जन मध्ये सुरक्षे संबंधित अनेक कमतरता आहेत. त्यांमुळे डेटिंग साठी बनलेले Bumble असो किंवा लोकप्रिय असे OkCupid, Cisco Teams आणि Grinder असोत, यासांसारखे अनेक अॅप्स प्रभावित झाले आहेत. बरोबरच Xrecorder, Power Director, Yango Pro आणि Edge अॅप्स वापरणारे युजर्स सुद्धा आपली सुरक्षा धोक्यात घालून बसू शकतात. गुगल ने तर एप्रिल महिन्यातच हा बग फिक्स केल्याचा दावा केला ह्तोआ. मात्र आजही कित्येक अॅप्स या बग च्या प्रभावाखाली असल्याचे आढळून आले आहे.
या बग मुळे युजर्स ची महत्त्वपूर्ण माहिती चोरी जाऊ शकते असे Check Point ने सांगितले आहे. त्यांच्या मते कोट्यावधी अॅन्ड्रॉइड युजर्स या धोक्या चा सामना करीत आहेत. हा बग इतका खतरनाक आहे की तो टू- फॅक्टर ऑथेंटिकेशनला तोडून तुमची बँकिंग बद्दलची माहिती चोरू शकतो.